MCGM Clerk Recruitment 2023 | BMC lipik bharti 2023| मुंबई मनपा लिपिक भरती 2023




मुंबई महापालिकेत कनिष्ठ लिपिकपदासाठी
१,१०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्रयस्थ संस्थेला काम देण्यात आले आहे. या संस्थे सोबत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा करारही झाला आहे.
आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थेकडून ही
भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मुंबई महापालिकेत ही भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
पालिकेत दर वर्षी रिक्त होणाऱ्या पदांनुसार लिपिक पदाची सुमारे ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठीच दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्याचे पालिके कडून नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात १,१०० पदांची भरती करण्यात येईल; तरउरलेल्या टप्प्यात ९०० पदांची भरती करण्यात येणार आहे. सरळसेवा, तसेच अंतर्गत अशा दोन्ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात
येईल.